गूढकथा म्हणजे केवळ रहस्यकथा नव्हेत.
मानवी मनाला जे गूढ़ वाटतं ते सारं काही त्यात येतं.
मरणाची कल्पना आपल्याला गूढ़ वाटते. त्यामुळे मरणाशी
संबंधित असलेल्या , पिशाच्चयोनी , पुनर्जन्म यासारख्या गोष्टी आपल्याला गूढ़ वाटतात.
परंतु प्रत्यक्ष जीवनामधेही, द्रष्टेपणा , स्वप्ने, आभास , इच्छाशक्ती ,
अंतर्ज्ञान यांसारख्या अनेक गूढ़ गोष्टी असतातच.
आणि माणसाचं मन ? -त्याचे अनेक व्यापार.....स्पष्टीकरणाच्यापलीकडचे-
या सगळ्यांनी तयार झालेली रत्नाकर मतकरींची गूढकथा.... तिचं वैशिष्ट्य हेच आहे की ती इतकी 'फ़ँन्टॅस्टिक' असूनही आपली वास्तवाची बैठक सोडत नाही.....
त्यांच्या कथेतला आशय टोकाचा कल्पनाविलास करतानाही वास्तवाच्या पातळीवर तितकाच सच्चा ठरतो.
मतकरींच्या गाजलेल्या कथांपैकी , त्यांनीच निवडलेल्या पंधरा-वीस नितांतसुंदर कथांचा संग्रह फ़ँटॅस्टिक .
फ़ँटॅस्टिक
लेखक: रत्नाकर मतकरी
आरती प्रकाशन
Sunday, January 25, 2009
फ़ँटॅस्टिक-रत्नाकर मतकरी
Posted by pravin at 9:02 AM 0 comments Links to this post
Thursday, January 15, 2009
द पिक्चर ऑफ़ डोरियन ग्रे-ऑस्कर वाइल्ड
सुप्रसिध्द ब्रिटिश लेखक ऑस्कर वाइल्ड (Oscar Wild), (१८५४-१९००), यांची 'द पिक्चर ऑफ़ डोरियन ग्रे' ही कादंबरी १८९१ मध्ये प्रसिध्द झाली. तेव्हा तिनं प्रचंड खळबळ उडवली होती. कला, सौंदर्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांवरील गंभीर लेखक (The critic as an artist, The Soul Of Man Under socialism), कवी आणि कथाकार ( poems, The Happy Prince & Other Stories, The House Of Pomegranates) , नाटककार (Lady Windermere's Fan, Woman of no importance, An ideal Husband, The Importance Of Being Earnest) म्हणून ते सुपरिचित असले , तरी मुख्यत: ते picture Of Dorian Gray चित्ररूप कादंबरीचे लेखक म्हणूनच त्यांची विशेष प्रसिद्धी आहे.
एक निरागस तरूणाला मिळालेला चिरतारूण्याचा वर आणि त्यानं स्वत:च्या हातानं करून घेतलेलं आत्मिक अध:पतन. त्याला पापाच्या काठावर नेऊन पोहोचवणारं मोहक तत्वज्ञान...
त्यातूनच माणसाचं बहकणारं मन आणि त्याची सदसदविवेकबुध्दी यांच्यातला संघर्ष चित्ररूप होऊन आपल्याडोळ्यांसमोर उभा राहतो.
वास्तवता आणि अद्धुतरम्यता, कोमलता आणि क्रौर्य यांच विलक्षण मिश्रण या कादंबरीत आहे.
लेखकाच्या रंगदार आणि काव्यात्म शैलीमुळे हे चित्र अधिकच देखणं आणि गहिरं होतं...
द पिक्चर ऑफ़ डोरियन ग्रे
मूळ लेखक: ऑस्कर वाइल्ड
अनुवाद : वि.शं. ठकार
Posted by pravin at 7:47 AM 0 comments Links to this post
Monday, January 5, 2009
आत्मचरित्राऐवजी-जयवंत दळवी
आत्मचरित्रे ही सर्वसाधारणपणे आत्मसमर्थनार्थ लिहीली जातात, असे जयवंत दळवींचे मत होते. खरेखुरेआत्मचरित्र लिहिण्याचे धैर्य नसेल तर भल्या माणसाने आत्मचरित्र लिहू नये असेही ते म्हणत असत.
प्रस्तुतच्या पुस्तकात दळवींच्या आत्मपर लेखांचे विलोभनीय दर्शन घडते. मत्स्याहार प्रिय असलेले रसिकखवय्ये म्हणून त्यांचे दर्शन ' माझे खाणेपिणे माझा मत्स्यावतार ', 'अनंताश्रम' ,'भंडारी हॉटेल' यांसारख्या लेखांतून घडते. कुटुंबातले दळवी 'माझ्या कुटुंबात मी' मधून उभे रहातात. 'दादरचे दिवस', 'आठवणीतली वास्तू' यांसारखे लेख त्यांच्यातील व्रात्य मुलाची आठवण करून देतात. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' यासारख्या लेखातून ते आपल्या मृत्युकडे ज्या खेळकरपणाने पहातात, आणि जय विनोदी ढंगात पेश करतात, ते अविस्मरणीय आहे. नाट्यक्षेत्रातल्या स्वःताच्या पडेल पदार्पणावरही ते तेवढ्याच खेळकरपणाने लिहितात. 'धी वर्ल्ड इज लाइक धिस' हा युसिसमधील नोकरीच्या काळातील अमेरिकन अधिकारयांविषयीचा लेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. 'माझ्यासाहित्यातील धर्म' व 'देहधर्म', 'चक्र' शी नसलेला संबंध' या लेखांतून साहित्यिक दळवींचे दर्शन घडते.
दळवींची शैली ही अत्यंत पारदर्शक आहे. दळवींच्या आयुष्यातील व्यक्ती-घटना-प्रसंग या विषयींचे हे मार्मिकलेखन गजालीच्या स्वरूपात वाचकांसमोर उलगडत जाते आणि वाचक त्यात गुंतत जातो.
आत्मचरित्राऐवजी
-जयवंत दळवी
सौजन्य: मॅजेस्टिक प्रकाशन
Posted by pravin at 11:40 PM 0 comments Links to this post