Friday, September 10, 2010

-- सुचिता देशपांडे
सत्यजित रे यांनी लिहिलेल्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या साहसकथांनी बंगालमधील कित्येक पिढय़ांतीलकिशोरवयीन मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मूळ बंगाली पुस्तकाचा जो इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला, त्यातील निवडक १२ रहस्यकथांचा अशोक जैन यांनी मराठी अनुवाद केला असून ‘रोहन प्रकाशन’ने हा संग्राह्य संचअलीकडेच प्रकाशित केला आहे. मराठीत कुमार-साहित्य फारच मर्यादित आहे. या संचामुळे कुमार साहित्यातमोलाची भर पडली आहे.
या साहसकथांचा अनुवाद करताना बंगाली व्यक्ती, स्थळं, खाद्यपदार्थ यांच्या मूळ बंगाली नावांचं उच्चारण, तसंचबंगाली सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्याचा अशोक जैन यांनी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न दिसून येतो. या साहसकथा जरी कुमार आणि किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या असल्या तरी त्यातील नाटय़, उत्कंठा मोठय़ावयाच्या वाचकांनाही तितकंच भुरळ घालतं. या साहसकथांमध्ये ओढूनताणून पैदा केलेलं रहस्य नाही, तर यातीलसर्वच कथांची रचना, बांधणी, सूत्रमांडणी अत्यंत परिपक्व आहे. सत्यजित रे यांचं मोठेपण या बालवाचकांसाठीलिहिलेल्या रहस्यकथांमधून अधोरेखित झालंय. या कथांमध्ये येणारे प्रसंग, त्यातील वाढत जाणारं उत्कंठानाटय़आणि सरतेशेवटी फेलूदाने केलेला रहस्यभेद- या सर्व प्रक्रियेमध्ये वाचकही सहभागी होत जातात. कोण असेल बरंदोषी, या वाचकाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत संगतवार त्यांच्या हाती लागतं. या रहस्यकथांच्या लैखनशैलीतकुठेही अवाजवी अभिनिवेश, आक्रस्ताळेपणा नाही आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हिंसा नाही. तरीही त्यातीलव्यक्तिरेखा, प्रसंगचित्रण इतकं जिवंत आहे की, त्यामुळे वाचक त्या गोष्टीत पुरता गुंतत जातो.
रहस्य उलगडून दाखवणारा फेलूदा हा या १२ साहसकथांमधील समान धागा जरी असला तरी त्यातील प्रत्येक कथाही वेगळ्या वळणाची आहे. कोलकात्यासह गंगटोक, लखनौ, राजस्थान, सिमला, हजारीबाग, जगन्नाथपुरीचासमुद्रकिनारा, काठमांडू, भुवनेश्वर, वाराणसी, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रहस्यकथा घडतात. त्याठिकाणचा निसर्ग, तिथली संस्कृती, लोकपरंपरा, वन्यजीवन इतक्या सहजपणे या कथांमध्ये डोकावलं आहे, कीत्यामुळे या कथा अधिक जिवंत, एकजिनसी झाल्याचं वाचताना जाणवतं.
सत्यजित रे या अफलातून माणसाची निरीक्षणशक्ती, प्रसंगांची तपशीलवार मांडणी व लेखनशैली यामुळे यारहस्यकथांचा वाचकवर्ग सीमित राहत नाही. त्यांच्या निरीक्षणशक्तीचा एक नमुना द्यायचा म्हणजे ‘गंगटोकमधीलगडबड’ या कथेत एक वाक्य आहे- ‘या प्रदेशात एखादी जळू झाडावरून तुमच्या डोक्यावर फक्त जुलै आणिऑगस्टमध्येच पडू शकते. वर्षांतील बाकीच्या दिवसांत जळवा फक्त जमिनीवर असतात.’
या कथांमध्ये तिथल्या जीवनशैलीचे, ऋतुमानाचे इतके बारकावे आलेत, की त्यामुळे साहजिकच या कथांना एकवेगळा प्रादेशिक बाज आलेला आहे. मूळ कथेतील भाषिक आणि लोकसंस्कृतीचे हे सारे कंगोरे अनुवादातहीचपखलपणे पकडण्यात जैन यशस्वी ठरले आहेत. म्हणूनच या केवळ रहस्यकथा नाहीत, तर त्यापलीकडेझेपावणाऱ्या साहित्याच्या खाणाखुणा या कथांमध्ये सापडतात. या पुस्तकांमधील व्यक्तिचित्रांमध्ये तल्लख वतडफदार फेलूदा, त्याचा चुलतभाऊ तपेश ऊर्फ तोपशे आणि त्यांच्या समवेत अनेकदा असणारे लालमोहनबाबू उर्फसहस्यकथा-लेखक जटायू हे धांदरट गुंडय़ाभाऊ असे त्रिकूट मराठी वाचकांनाही नक्कीच भुरळ घालेल.
सत्यजित रे यांचे साहित्य ‘संदेश’ या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर ते अल्पावधीतच लोकप्रियझाले. गुप्तहेर फेलूदा ही त्यांनी रेखाटलेली व्यक्तिरेखाही अजरामर झाली आणि बंगाली सांस्कृतिक जीवनाचा एकअविभाज्य भाग बनली. फेलूदाच्या साहसकथा प्रत्यक्ष लिखाणाचा कालखंड आणि या १२ पुस्तकांचा आता मराठीझालेला अनुवाद यात काळाचे बरंच अंतर असलं तरी ही पुस्तकं वाचताना काळाचं हे अंतर तसूभरही जाणवतनाही, हेच या कथांचं बलस्थान म्हणायला हवं.
या पुस्तकांच्या संचामध्ये बादशहाची अंगठी, गंगटोकमधील गडबड, सोनेरी किल्ला, केस-अॅटॅची केसची, कैलासातील कारस्थान, रॉयल बेंगॉलचे रहस्य, गणेशाचे गौडबंगाल, मुंबईचे डाकू, दफनभूमीतील गूढ, देवतेचाशाप, मृत्यूघर, काठमांडूतील कर्दनकाळ अशा १२ पुस्तकांचा समावेश आहे.
(‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ संच- रोहन प्रकाशन, या १२ पुस्तकांचा ९०० रुपयांचा संच ६७५ रुपयांना सवलतीत उपलब्धआहे. त्याचसोबत कोणत्याही दोन पुस्तकांसोबत एक आकर्षक, लहानसे स्लॅमबुक भेट म्हणून देण्यात येत आहे. )

-[ Credit: This article is written by Suchita deshpande for daily newspaper loksatta -29 august 2010]

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...