Saturday, December 5, 2009पृथ्वीतलावरच्या आपल्या पहिल्यावाहिल्या श्वासापासून आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे आई... आणि त्यानंतर आयुष्यानं कशीही वळणं घेतली तरी सदैव त्याच भूमिकेत आपली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोबत करणारी व्यक्ती म्हणजेही आईच। आई या विलक्षण शब्दाभोवती गुंफलेल्या या कथा स्थळ, काळ सार्या भेदांपलीकडं जाऊन आईच्या त्याच वात्सल्याचा स्पर्श घडवतात. फक्त आणि फक्त प्रेम, माया, आस्था, जिव्हाळा, जपणूक या आणि अशाच भावभावनांचे रेशीमधागे गुंफणार्या या कथा साध्या साध्या प्रसंगांतून अतिशय लोभस भावनेचं दर्शन घडवत आपल्याला आपल्या आईची आठवण करून देतात.

चिकन सूप फॉर द मदर्स सोल

मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड मार्क व्हिक्टर हॅन्सन

अनुवाद : सुप्रिया वकील

प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...