चाळीस लाख वर्षांपूर्वी त्या चकाकणारया काळ्या पाषाणाने मानवपणाची ठिणगी टाकून मानवी उत्क्रांतीला चालना दिली. एकविसाव्या शतकात तसाच काळा पाषाण चंद्रावर सापडला. त्यानंतर डेव्ह बौमन, फ्रँक पूल आणि त्यांचा महासंगणक हअल यांच्या धाडसी मोहिमेला सुरूवात झाली.
गुरूचा उपग्रह असणारया युरोपावरच्या तिसरया पण अतिभव्य पाषाणाशी झालेल्या झगड्यामध्ये फ़क्त डेव्ह बौमन वाचला.त्याच यंत्र-मानवात रूपांतर झालं.
सन ३००१.... मानवजात अजून आश्चर्यकारकरित्या टिकून आहे. तिन्ही पाषाणांचं सूर्यमालेवर वर्चस्व आहे. अचानक हजार वर्षापूर्वी अंतराळात हरवलेल्या फ्रँक पूलचा शोध लागतो. गोठलेल्या अवस्थेमधल्या फ्रँक पूलला पुन्हा जागं करण्यात येतं. हजार वर्षापूर्वी गुरू ग्रहाकडे गेलेल्या मोहिमेमधलं मुख्य काम पूर्ण करण्यासाठी फ्रँक युरोपाकडे जातो आणि पाषाणानं ओढून घेतलेला डेव्ह बौमन आणि महासंगणक हअल त्यांना माहीत झालेलं भीषण सत्य सांगतात.
मानवजातीचं भवितव्य त्याच्याशी निगडित आहे....
३००१ द फायनल ओडिसी
मूळ लेखक: आर्थर सी. क्लार्क
अनुवाद: डॉ. प्रमोद जोगळेकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
Wednesday, April 15, 2009
३००१ द फायनल ओडिसी-आर्थर सी. क्लार्क
Posted by pravin at 7:52 PM 0 comments Links to this post
Sunday, April 5, 2009
'टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट'
पात्रयोजना,कथानक, विषय आणि पार्श्वभूमी
या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारया
जेफ्री आर्चर यांच्या कथांचा हा संग्रह.
या सर्वच कथांतून जेफ्री आर्चर यांच्या लेखणीचे कसब आणि लालित्य दिसून येते. प्रत्येक
वाचकाला या कथासंग्रहात स्वत:च्या पसंतीची
एकतरी कथा हमखास सापडेल.
यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर
झालेली नजरानजर व त्यातून फुलून आलेली प्रेमकथा आहे; प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या
बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे
वाकवणारया कायदेतज्ज्ञाची कथा आहे तसेच ,
एक तरूणीची अत्यंत विलक्षण , सुरस आणि
चमत्कारिक कथा आहे. शेवटची 'द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर' अर्थात 'दुरून डोंगर साजरे' ही
सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे.
प्रत्येक कथेच्या शेवटाला जेफरी आर्चर यांनी एक
नाट्यपूर्ण कलाटणी दिलेली आहे. म्हणूनच हा
शेवट धक्कादायक वाटतो.
यातील अनेक विस्मयकारक कथा या सत्यघटनेवर आधारित आहेत.
'टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट' (To cut a long story short by Jefree Archer )
मूळ लेखक: जेफ्री आर्चर
अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
Posted by pravin at 11:14 AM 0 comments Links to this post