Wednesday, March 25, 2009

आफ्रिकेच्या जंगलात जावून वावरावं , असं त्याला लहानपणापासून वाटत होतं
त्यासाठी त्याची तयारी म्हणजे
एक हंटिंग नाईफ... बस !

तो जंगलात शिरला , तेव्हा त्याला उपाशी राहावं लागलं.
आदिवासींनी दया येवून दिलेलं अन्न खाणं त्याच्या जिवावर आलं. मग तो अन्न चोरायची कला शिकला आणि सिंहाच्या तावडीत सापडला.

त्याला जन्मतःच एक शाप होता. त्याला अपस्माराचे झटके यायचे. पण हा शाप आफ्रिकेत वरदान ठरला. त्यामुळे आफ्रिकनांनी त्याला आपलं म्हटलं. यामुळे त्याच्या हातून खूप शोध लागले.

अशा या एका विचित्र संशोधकाची ही कथा.
' लायटनिंग बर्ड' अथवा विदुल्लता पक्षी.

निसर्गपुत्र
मूळ लेखक : लायल वाटसन
मराठी अनुवाद: निरंजन घाटे
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस

Sunday, March 15, 2009

' हेन्री यांच्या उत्कृष्ट पंधरा कथा.
प्रेम-दु:-आशा-आणि-आनंद-
या मानवी भावनांशी संबंधित या कथा आहेत.
लघुकथेतील 'जाने-माने' कथाकार-
'
हेनरी' यांच्या या उत्कृष्ट कथा आहेत.
त्या प्रत्येक कथेतील शेवट-
वाचकांना आश्चर्याचा धक्का देतो.

नॉर्थ कँरोलिना येथे प्रथम ते
'
विल्यम सिडने पोर्टर' या नावाने
वास्तव्य करीत होते.
त्यानी आपल्या लिखाणाची
सुरूवात टेक्सासच्या तुरूंगात केली.

त्यांच्या इतर कथांपेक्षा
'
न्यूयॉर्क' झाले शहराबद्दलच्या त्यांच्या
पंधरा कथा जास्त प्रसिद्ध आहेत.
त्याच शहरात
'
हेनरी' यांचे १९१० साली निधन झाले .
हेन्रीज अमेरिकन सीन्स'
अनुवाद: अरूण डावखरे
पॅपिलॉन पब्लिशिंग हाऊस

Thursday, March 5, 2009

किडनँपर्सनी त्याला जमिनीखाली- एका लाकडी पेटीमध्ये-जिवंतपणी पुरून ठेवलं होतं...! त्याच्या सुटकेच्यामोबदल्यात त्यांनी पाऊण लाख डॉलर्सची मागणी केली होती. मृत्यूपेटीत गाडल्या गेलेल्या मायकेल बाकम यातरूणाची अंगावर शहारे आणणारी भीषण कहाणी...!!

ज्या कथांची वाचक आतुरतेनं वाट पाहत होते त्या दुर्मीळ कथा...
एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेववणार नाही असा अजोड साहसकथासंग्रह.

रसिक वाचकांना आवडेल अशी एक अनुपम पेशकश !
मृत्युपेटीत पाच दिवस इतर साहसकथा
लेखक : विजय देवधर
सौजन्य: नवचैतन्य प्रकाशन

Related Posts Plugin for WordPress, Blogger...