Thursday, December 25, 2008

ही एक विज्ञान कादंबरी आहे.
'स्टार ब्रिज' या जँक विल्यमसन आणि जेम्स गन यांच्या मूळ पाश्च्यात्य कादंबरीचा अनुवाद.
गेल्या काही वर्षात आपल्या समाजाची
अशी काही घडण झाली की, शेल्डन, विल्बर स्मिथ, फोरसीथ, लुडलम,इरविंग,
हेराल्ड रॉबिन्स, आर्थर हेली आणखी एक दोन असे अपवाद वगळता एकूण इंग्रजी साहित्याच्या वाचनाचे प्रमाण कमी होत आहे; आणि विज्ञानकथांचे तर त्याहून कमी होत आहे; आणि वाचक नाहीत म्हणून पुस्तकांची उपलब्धीही कमी होत आहे.
'स्टार ब्रिज' आणि यांसारख्या अनेक उत्तम कथा यांच अस्तित्व विचक्षण वाचकांना  ज्ञात होणार नाही; आणि अशा उत्तम कथांच्या आस्वादापासून ते वंचितच राहतील.
अशा चोखंदळ, अभिरूचिपूर्ण वाचकांसाठी ही कादंबरी म्हणजे बौद्धिक मेजवानीच आहे.

अवकाशाशी जडले नाते
अनुवाद: नारायण धारप
सौजन्य: मेहता पब्लिशिंग हाउस
Author: Jack Williamson & James Gun
Novel: Star Bridge

Monday, December 15, 2008

ऑक्सफोर्डशाय्ररमधल्या एका गावरस्त्यावरून एक युवकाचे अपहरण हा
अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या आत्यंतिक क्रूर
अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरीत्या पार
पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्क्याने मानसिक आणि भावनिकदृष्टया
खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता.

हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकाच व्यक्ती थोपवून धरू शकत होती- क्विन!
अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ.

या अपहरणनाट्याचा उलगडा होत असताना श्वास रोखून ठेवणा॒रया औत्सुक्याने
वाचक कधी कमालीचा उत्तेजित होतो. कधी आश्चर्याने चकित होतो, कधी अंगावर
कोसळणारया तपशीलामुळे गोठल्यासारखा होतो. फ्रेडरिक फोरसिथ या जागतिक
कीर्तीच्या लेखकाने विलक्षण कौशल्याने विणलेली ही चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी
वाचताना थरारक अनुभवांमुळे तुम्ही पानापानावर स्तंभित होणार आहात

मध्यस्थ-फ्रेडरिक फोरसीथ
मराठी अनुवाद: सौ. सोहनी
सौजन्य: मेहता पब्लिशिंग हाउस
(The Negotiator by Frederick Foresyth)

Friday, December 5, 2008

१९३९ सालचा में महीना होता. महायुध्दाला सुरूवात होउन अठरा महीने लोटले होते. या अठरा महिन्यांत जर्मनीची सतत सरशी होत होती.पश्चिम युरोपातील छोटी छोटी राज्ये शिस्तबध्द , आक्रमक जर्मन युध्दयंत्रणेने तेव्हाच धुळीला मिळवली होती.

फ्रांसच्या सरहद्दीवर असलेली अभेद्य मॅजिनो तटबंदी,
जर्मन सेनेच्या पहिल्या धड़कीसरशी कोलमडून पडली होती.
यथाकाल फ्रान्सचा पाड़ाव झाला. खांद्याला खांदा भिडवून लढणारा
ब्रिटनचा मित्र गमावला.ब्रिटन एकाकी झाले.

एकाकी पडलेल्या ब्रिटनला उखडून टाकण्यासाठी हिटलरने
आपले सगळे सामर्थ्य एकवटले. जर्मन विमानांनी ब्रिटनव्रर भीषण बाँबफेक करून
ब्रिटनची भूमी
आणि ब्रिटनचे मनोधैर्य बेचिराख करण्याचा निकराचा प्रयत्न चालू केला.
त्याच्याच जोडीला जर्मन पाणबुड्यांनी आणि लढाऊ नौकांनी
ब्रिटनचे सागरीमार्ग रोखून , अन्नधान्य आणणारया बोटी बुडवण्याचा सपाटा चालवला.

स्कार्नहॉर्स्ट , नायसेनोव, अडमिरल स्कीअर या जर्मन युध्दनौकांनी
काही काळ ब्रिटिश जनतेचा थरकाप उडवला होता. पण पंतप्रधान विंस्टन चर्चिल,
ब्रिटिश युध्दयंत्रणा अणि सामान्य जनता यांनी या संकटाला असीम धैर्याने तोंड दिले.

पिढ्यानपिढ्या पोवाडे गातील, असे रोमहर्षक पराक्रम गाजवले.
'बिस्मार्क'ची शिकार ही अशाच एक पराक्रमाची कहाणी होय.


'बिस्मार्क'ची शिकार (SINK THE BISMARK BY FRANK BRANOD)
अनुवाद: अनंत भावे
सौजन्य: मेहता पब्लिशिंग हाउस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...