Thursday, December 25, 2008

ही एक विज्ञान कादंबरी आहे.
'स्टार ब्रिज' या जँक विल्यमसन आणि जेम्स गन यांच्या मूळ पाश्च्यात्य कादंबरीचा अनुवाद.
गेल्या काही वर्षात आपल्या समाजाची
अशी काही घडण झाली की, शेल्डन, विल्बर स्मिथ, फोरसीथ, लुडलम,इरविंग,
हेराल्ड रॉबिन्स, आर्थर हेली आणखी एक दोन असे अपवाद वगळता एकूण इंग्रजी साहित्याच्या वाचनाचे प्रमाण कमी होत आहे; आणि विज्ञानकथांचे तर त्याहून कमी होत आहे; आणि वाचक नाहीत म्हणून पुस्तकांची उपलब्धीही कमी होत आहे.
'स्टार ब्रिज' आणि यांसारख्या अनेक उत्तम कथा यांच अस्तित्व विचक्षण वाचकांना  ज्ञात होणार नाही; आणि अशा उत्तम कथांच्या आस्वादापासून ते वंचितच राहतील.
अशा चोखंदळ, अभिरूचिपूर्ण वाचकांसाठी ही कादंबरी म्हणजे बौद्धिक मेजवानीच आहे.

अवकाशाशी जडले नाते
अनुवाद: नारायण धारप
सौजन्य: मेहता पब्लिशिंग हाउस
Author: Jack Williamson & James Gun
Novel: Star Bridge

Monday, December 15, 2008

ऑक्सफोर्डशाय्ररमधल्या एका गावरस्त्यावरून एक युवकाचे अपहरण हा
अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या आत्यंतिक क्रूर
अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरीत्या पार
पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्क्याने मानसिक आणि भावनिकदृष्टया
खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता.

हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकाच व्यक्ती थोपवून धरू शकत होती- क्विन!
अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ.

या अपहरणनाट्याचा उलगडा होत असताना श्वास रोखून ठेवणा॒रया औत्सुक्याने
वाचक कधी कमालीचा उत्तेजित होतो. कधी आश्चर्याने चकित होतो, कधी अंगावर
कोसळणारया तपशीलामुळे गोठल्यासारखा होतो. फ्रेडरिक फोरसिथ या जागतिक
कीर्तीच्या लेखकाने विलक्षण कौशल्याने विणलेली ही चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी
वाचताना थरारक अनुभवांमुळे तुम्ही पानापानावर स्तंभित होणार आहात

मध्यस्थ-फ्रेडरिक फोरसीथ
मराठी अनुवाद: सौ. सोहनी
सौजन्य: मेहता पब्लिशिंग हाउस
(The Negotiator by Frederick Foresyth)

Friday, December 5, 2008

१९३९ सालचा में महीना होता. महायुध्दाला सुरूवात होउन अठरा महीने लोटले होते. या अठरा महिन्यांत जर्मनीची सतत सरशी होत होती.पश्चिम युरोपातील छोटी छोटी राज्ये शिस्तबध्द , आक्रमक जर्मन युध्दयंत्रणेने तेव्हाच धुळीला मिळवली होती.

फ्रांसच्या सरहद्दीवर असलेली अभेद्य मॅजिनो तटबंदी,
जर्मन सेनेच्या पहिल्या धड़कीसरशी कोलमडून पडली होती.
यथाकाल फ्रान्सचा पाड़ाव झाला. खांद्याला खांदा भिडवून लढणारा
ब्रिटनचा मित्र गमावला.ब्रिटन एकाकी झाले.

एकाकी पडलेल्या ब्रिटनला उखडून टाकण्यासाठी हिटलरने
आपले सगळे सामर्थ्य एकवटले. जर्मन विमानांनी ब्रिटनव्रर भीषण बाँबफेक करून
ब्रिटनची भूमी
आणि ब्रिटनचे मनोधैर्य बेचिराख करण्याचा निकराचा प्रयत्न चालू केला.
त्याच्याच जोडीला जर्मन पाणबुड्यांनी आणि लढाऊ नौकांनी
ब्रिटनचे सागरीमार्ग रोखून , अन्नधान्य आणणारया बोटी बुडवण्याचा सपाटा चालवला.

स्कार्नहॉर्स्ट , नायसेनोव, अडमिरल स्कीअर या जर्मन युध्दनौकांनी
काही काळ ब्रिटिश जनतेचा थरकाप उडवला होता. पण पंतप्रधान विंस्टन चर्चिल,
ब्रिटिश युध्दयंत्रणा अणि सामान्य जनता यांनी या संकटाला असीम धैर्याने तोंड दिले.

पिढ्यानपिढ्या पोवाडे गातील, असे रोमहर्षक पराक्रम गाजवले.
'बिस्मार्क'ची शिकार ही अशाच एक पराक्रमाची कहाणी होय.


'बिस्मार्क'ची शिकार (SINK THE BISMARK BY FRANK BRANOD)
अनुवाद: अनंत भावे
सौजन्य: मेहता पब्लिशिंग हाउस

Saturday, November 29, 2008

अरे बापरे...साप! -साप दिसला की आपली पहिली प्रतिक्रिया ही असते. प्रत्येक साप हा विषारीच असणार, तो आपल्याला चावणार आणि त्यामुळे आपण मरणार ; ही अंधश्रध्दा सर्वसामान्य माणसाच्या मनात घर करून बसलेली आहे. त्यामुळे साप दिसला रे दिसला की त्याला मारून टाकणे हे आपल्याला आपले परम कर्तव्यच वाटते. सापाविषयी इतरही अनेक अंधश्रध्दा आपल्या मनात असतात.

सापांचे प्रकार किती? त्यांची वैशिष्टे कोणती? विषारी बिनविषारी साप कोणते? अशी सर्व माहिती या पुस्तकातून मिळते.
त्याचसोबत सापांविषयीच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत अंधश्रध्दांचे निराकरणही हे पुस्तक उत्तमरित्या करते.
साप-समज गैरसमज
लेखक:भालचंद्र मयेकर
प्रकाशन:मनोविकास प्रकाशन

Wednesday, October 15, 2008

त्याची आई कुत्री होती॰
त्याचा जन्म लांड़ग्यांच्या कळपात झाला॰
या क्रूर जगात तो लहानचा मोठा झाला॰
कुत्र्यांशी त्याचं फक्त शत्रुत्वाचं नातं होतं॰
माणसांनी नेहमीचं त्याला झिडकारलं॰
खुनी म्हणूनचं त्याला सगळे ओळखत होते .
तो चोरी करून जगत होता॰
तो लांडगा होता का कुत्रा ते कधीच कोणी ठरवू शकलं नाही.
तो लांडग्यांपेक्षा हिंस्र होता॰
माणसांपेक्षा कुटिल होता॰
तो बुद्धिमान होता.
तो योद्धा होता.
एकांड्या,अस्थिर आणि रक्तरंजित वाटचालीत तो फक्त एकाच गोष्ट शोधत होता, ... प्रेम!'
मानवी वाटावी एवढी हळूवार, चिंतनशील तरीही अविस्मरणीय कहाणी॰
अवश्य वाचा- जॅक लंडन ची अविस्मरणीय कादंबरी-व्हाइट फँग
मराठी अनुवाद :लांडगा
लेखक :अनंत सामंत
सौजन्य: मॅजेस्टिक प्रकाशन

Tuesday, October 7, 2008

वाचून झाल्यावर मनाला हुरहूर लावणारी कहाणी.
मार्सेल पॅग्नोल यांच्या 'दी डेज वेअर टू शॉर्ट ' या आत्मचरित्राचे 'गेले, ते दिन गेले ' हे विलास फडके यांनीकेलेले स्वैर भाषांतर॰दिसायला बाहुलीसारखी नाजुक सुंदर अशी आई, शाळेत शिक्षक असणारे वडील आणि घराण्याचा वारसा लाभलेल्या इसमाचे बालपण विशेष ते काय असणार? पण अशा सामान्य माणसांच्या कुटुंबात एकमेकांवर असणारं प्रेम, नीतिमुल्यांची चाड, लिलिसारख्या बालमित्राची निरपेक्षदोस्ती हे सारं मार्सेल पॅग्नोल यांनी इतकं हुबेहूब चितारलं आहे की, वाचकाला ते स्वतःचचं वाटावं.प्रख्यात फ्रेंच नाटककार,फ्रेंच अकादमीद्वारा सन्मानित मार्सेल पॅग्नोल आपलं बालपण एखाद्या चित्रपटकथेप्रमाणे रंगवू शकले असते; पण त्यातही त्यांनी बालपणाचा निर्व्याजपणा कायम ठेवावा आणि ते दिवस फारच लौकर संपले याविषयी हळहळ व्यक्त करावी याचं कारण ही कहाणी वाचल्यावरच समजेल.
गेले , ते
दिन गेले
लेखक:मार्सेल पँग्नोल
अनुवादक: विलास फडके
,
Novel:(The days are too short-Marsel Pagnol)

Friday, September 5, 2008


रसायनशास्त्रातल्या
महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मदुमलाईच्या जंगलातप्राणीनिरीक्षणात घालवण्याची संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं जंगलप्रेमउफाळून आलं. तो वर्षभर त्या जंगलात राहिला, पण एखाद्या 'उपऱ्यां ' निरिक्षकसारखा नाही तर खऱ्यांखुऱ्यां जंगलपुत्रासारखा राहिला.
त्या जंगलातले हत्ती,रानगवे,रानकुत्री,अस्वले,यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं-पारखलं. त्याच्या या शोधयात्रेत आलेल्या सुंदर,थरारक,रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगलस्त्रोत्रात न्हाउन निघालेले आणि वाचकांना रानवेडाची दीक्षा देणारं 'मदुमलाई' सूक्त आहे।.
कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं....आणि त्याच्या नजरेतून जे निसटलं त्याबद्दल हूरहूर लावणारं...

सौजन्य-राजहंस प्रकाशन,पुणे

L
cve MARATHI, feel MARATHI

Related Posts Plugin for WordPress, Blogger...