Saturday, November 29, 2008
अरे बापरे...साप! -साप दिसला की आपली पहिली प्रतिक्रिया ही असते. प्रत्येक साप हा विषारीच असणार, तो आपल्याला चावणार आणि त्यामुळे आपण मरणार ; ही अंधश्रध्दा सर्वसामान्य माणसाच्या मनात घर करून बसलेली आहे. त्यामुळे साप दिसला रे दिसला की त्याला मारून टाकणे हे आपल्याला आपले परम कर्तव्यच वाटते. सापाविषयी इतरही अनेक अंधश्रध्दा आपल्या मनात असतात.
सापांचे प्रकार किती? त्यांची वैशिष्टे कोणती? विषारी व बिनविषारी साप कोणते? अशी सर्व माहिती या पुस्तकातून मिळते.
त्याचसोबत सापांविषयीच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत अंधश्रध्दांचे निराकरणही हे पुस्तक उत्तमरित्या करते.
साप-समज गैरसमज
लेखक:भालचंद्र मयेकर
प्रकाशन:मनोविकास प्रकाशन
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment