Thursday, March 5, 2009
किडनँपर्सनी त्याला जमिनीखाली- एका लाकडी पेटीमध्ये-जिवंतपणी पुरून ठेवलं होतं...! त्याच्या सुटकेच्यामोबदल्यात त्यांनी पाऊण लाख डॉलर्सची मागणी केली होती. मृत्यूपेटीत गाडल्या गेलेल्या मायकेल बाकम यातरूणाची अंगावर शहारे आणणारी भीषण कहाणी...!!
ज्या कथांची वाचक आतुरतेनं वाट पाहत होते त्या दुर्मीळ कथा...
एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेववणार नाही असा अजोड साहसकथासंग्रह.
रसिक वाचकांना आवडेल अशी एक अनुपम पेशकश !
मृत्युपेटीत पाच दिवस व इतर साहसकथा
लेखक : विजय देवधर
सौजन्य: नवचैतन्य प्रकाशन
Wednesday, February 25, 2009
मार्टिन जॉन्सन व ओसा जॉन्सन हे एक जगावेगळे अमेरिकन जोडपे.
मार्टिन हा हौशी छायाचित्रकार. ऐन विशीत तो विख्यात प्रदेश-संशोधक जॅक लंडन याच्याबरोबर जलमार्गाने जगपर्यटन करून आला. त्याच्या पराक्रमावर मोहित होउन ओसाने मार्टिनशी लग्न केले. एवढेच नव्हे तर लग्नानंतरओसाने त्याच्याबरोबर सातासमुद्रापलीकडे एकूण सहा वेळा धाडसी पृथ्वीप्रदक्षिणा केल्या. त्याच्या जोडीने तीअज्ञात निसर्गाशी झगडली, हिंस्रश्वापदांना सामोरी गेली, आणि निबिड़ अरण्यातल्या आदिवासी नरभक्षकांच्या जबड्यातही खुशाल उतरली ! मार्टिनने शेकडो स्थिर छायाचित्रे घेतली , हजारो फूट लांबीचे चलचित्रपट तयार केले. ओसाने आपल्या धाडशी अनुभवांवर काही पुस्तके लिहिली. त्यांपैकीच ही तिची स्वत:ची अत्यंत नाट्यपूर्ण आत्मकथा !
नरभक्षकांच्या जबड्यात !
लेखिका : ओसा जॉन्सन
अनुवाद : रंगा मराठे
राजहंस प्रकाशन

