Saturday, September 5, 2009
अँलिस्टर मॅक्लीननी अनेक नायक रंगवले. त्यातलाच एक म्हणजे पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अमली द्रव्यविरोधी विभागाचा एक जबाबदार अधिकारी. पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अँमस्टरडॅममधल्या संशयास्पद अमली द्रव्यांच्या व्यवहाराचा शोध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अँमस्टरडॅममधे उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्याची हत्या होते आणि त्यानंतर सुरू होते संकटांची मालिका... अँमस्टरडॅममधले रस्ते, कालवे, चर्च, इमारती कळत-नकळत त्याला काही सुचवू लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. वाक्यावाक्याला खिळवून ठेवणारी पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा काळजाचा ठोकाच चुकवते. हीच तर मॅक्लीनच्या लेखणीची खासियत!
मूळ लेखक : अँलिस्टर मॅक्लीन
अनुवादक : माधव कर्वे
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
Wednesday, August 5, 2009
वार्यासोबत न वाहून गेलेली आणि वार्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे! हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच, ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोर्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा . शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हृद्गत करतील!
नॉट गॉन विथ द विंड
लेखक : विश्वास पाटील
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

