Monday, October 5, 2009

राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तर्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती राहिलेला आहे. नया कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.
-रणधीर शिंदे

आपण माणसात जमा नाही

लेखक : राजन गवस

प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Saturday, September 5, 2009

अँलिस्टर मॅक्लीननी अनेक नायक रंगवले. त्यातलाच एक म्हणजे पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अमली द्रव्यविरोधी विभागाचा एक जबाबदार अधिकारी. पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अँमस्टरडॅममधल्या संशयास्पद अमली द्रव्यांच्या व्यवहाराचा शोध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अँमस्टरडॅममधे उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्याची हत्या होते आणि त्यानंतर सुरू होते संकटांची मालिका... अँमस्टरडॅममधले रस्ते, कालवे, चर्च, इमारती कळत-नकळत त्याला काही सुचवू लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. वाक्यावाक्याला खिळवून ठेवणारी पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा काळजाचा ठोकाच चुकवते. हीच तर मॅक्लीनच्या लेखणीची खासियत!
मूळ लेखक : अँलिस्टर मॅक्लीन
अनुवादक : माधव कर्वे
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...