Sunday, April 5, 2009

पात्रयोजना,कथानक, विषय आणि पार्श्वभूमी
या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारया
जेफ्री आर्चर यांच्या कथांचा हा संग्रह.

या सर्वच कथांतून जेफ्री आर्चर यांच्या लेखणीचे कसब आणि लालित्य दिसून येते. प्रत्येक
वाचकाला या कथासंग्रहात स्वत:च्या पसंतीची
एकतरी कथा हमखास सापडेल.

यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर
झालेली नजरानजर त्यातून फुलून आलेली प्रेमकथा आहे; प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या
बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे
वाकवणारया कायदेतज्ज्ञाची कथा आहे तसेच ,
एक तरूणीची अत्यंत विलक्षण , सुरस आणि
चमत्कारिक कथा आहे. शेवटची ' ग्रास इज ऑलवेज ग्रीनर' अर्थात 'दुरून डोंगर साजरे' ही
सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे.

प्रत्येक कथेच्या शेवटाला जेफरी आर्चर यांनी एक
नाट्यपूर्ण कलाटणी दिलेली आहे. म्हणूनच हा
शेवट धक्कादायक वाटतो.
यातील अनेक विस्मयकारक कथा या सत्यघटनेवर आधारित आहेत.

'टू कट लाँग स्टोरी शॉर्ट' (To cut a long story short by Jefree Archer )
मूळ लेखक: जेफ्री आर्चर
अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...