Friday, June 5, 2009
परदेशात काम करणारा एक तरुण, जिज्ञासू भारतीय संशोधक . संशोधन करताकरता हाती आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुपितापायी मारला जातो, आणखी एक अनाकलनीय गुपित मागे ठेवून. त्या गुपिताचा एक हिस्सा असते त्याची बहीण. एक सामान्य मुलगी. ही सामान्य मुलगी त्या अनोळख्या देशात आपल्या मृत भावाचं शरीर ताब्यात घ्यायला निघते. तेथील अपरंपार अडचणींची जाणीव असूनही स्वत:ला खंबीर बनवते. प्रत्यक्षात मात्र संकटांची एक जीवघेणी मालिकाच तिच्याभोवती सुरू होते... तिचा अक्षरश: अंत बघू लागते... ते गुपित आणि त्या जीवघेण्या गुपिताची पाळंमुळं जिथपर्यंत पोहोचली होती, तो भयानक मार्ग! सारंच गूढ, अतर्क्र्य...
ऑपरेशन मोलॅसिस
लेखक : अरुण हेबळेकर
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
Labels: suspense thriller
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment