Friday, March 5, 2010
जर तेरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच, सातवीतूनच शाळेला रामराम ठोकून, एका अडाणी, मंदबुद्धी आणि दुप्पट वयाच्या माणसाबरोबर तुझी गाठ बांधली गेली, अंगावर दूध पिणारं एक मूल असतानाच दुसर्याची चाहूल लागली आणि पाहता पाहता तीन मुलांची आई झालीस, पंचविशीतच शरीर आणि मन थकलं असतानाही मुलांसकट दूर एखाद्या अनोळख्या गावी जावं लागलं। पोटासाठी मोलकरणीचं काम करतानाच मुलांची दुखणी, अभ्यास, पैसा ह्यांची सतत काळजी वाहावी लागली आणि असं असतानासुद्धा, स्वत:च्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात सर्व अडचणींना तोंड देत इथपर्यंत कसे आलो, हे सातवीपर्यंतत शिकलेल्या मोडक्यातोडक्या पण अतिशय सरळ भाषेत सांगण्याची जिद्द तुझ्यात असेल, तर सखे, तुझं दुसरं नाव असेल बेबी हालदार. जिच्या "आलो-आंधारि' ह्या आत्मकथेनं साहित्य-जगतात खळबळ उडवून दिली.
आलो आंधारि
मूळलेखक : बेबी हालदार
अनुवादक : मृणालिनी गडकरी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
0 comments:
Post a Comment