Wednesday, May 5, 2010

आक्र्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. 300 वर्षापूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न दा विंची कोड व एंजल्स अँड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका

डिसेप्शन पॉइंट (Deception point by Dan Brown )
मूळ लेखक :
डँन ब्राउन
अनुवाद : अशोक पाध्ये
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस
Deception Point is a 2001 techno-thriller novel by Dan Brown.

1 comments:

निखिल said...

तुमचा ब्लॉग वाचला उत्तम आहे.
तुमची आवड बघता तुम्हाला http://www.pustakvishwa.com हे संकेतस्थळ सुद्धा आवडेल.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...