Sunday, July 5, 2009

सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा! उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षाच्या वाटचालीत घडलेला एक "अपघात'! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख "किवी' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो! निसर्गरम्य पार्श्व्भूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वौशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती!
कर्वालो

मूळ लेखक : तेजस्वी पूर्णचंद्र के. पी.

अनुवादक : उमा कुलकर्णी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस


Friday, June 5, 2009

परदेशात काम करणारा एक तरुण, जिज्ञासू भारतीय संशोधक . संशोधन करताकरता हाती आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुपितापायी मारला जातो, आणखी एक अनाकलनीय गुपित मागे ठेवून. त्या गुपिताचा एक हिस्सा असते त्याची बहीण. एक सामान्य मुलगी. ही सामान्य मुलगी त्या अनोळख्या देशात आपल्या मृत भावाचं शरीर ताब्यात घ्यायला निघते. तेथील अपरंपार अडचणींची जाणीव असूनही स्वत:ला खंबीर बनवते. प्रत्यक्षात मात्र संकटांची एक जीवघेणी मालिकाच तिच्याभोवती सुरू होते... तिचा अक्षरश: अंत बघू लागते... ते गुपित आणि त्या जीवघेण्या गुपिताची पाळंमुळं जिथपर्यंत पोहोचली होती, तो भयानक मार्ग! सारंच गूढ, अतर्क्र्य...
ऑपरेशन मोलॅसिस
लेखक : अरुण हेबळेकर
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...