Wednesday, August 10, 2011
हिमालय म्हणजे स्वर्ग! मग हिमालयातील पुष्पदरीला स्वर्गाचे नंदनवनच म्हटले पाहिजे. या पुष्पदरीला आयुष्यात एकदी तरी भेट देण्याचे मनसुबे प्रत्येक जण आखत असतो. पण अवाढव्य पसरलेल्या हिमालयाच्या अंगावर विसावलेल्या या पुष्पदरीला जायचे कसे इथपासून ते तिथे कधी जायचे, काय पाहायचे असे अनंत प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. एकतर अशा विषयांवर शास्त्रीय आणि माहितीपूर्ण असे लेखन नाही. असलेच तर ते मराठीत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पुण्याच्या स्नेहल प्रकाशन संस्थेच्यावतीने नुकतेच या पुष्पदरीची सांगोपांग माहिती देणारे एक शास्त्रीय पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे, - ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’!
प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेल्या या बहुरंगी पुस्तकातून जणू ही पुष्पदरीच आपल्याशी बोलते. मूळात भटकंतीची आवड आणि त्यामध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास यामुळे प्रा. घाणेकरांच्या या पुस्तकाद्वारे एक मार्गदर्शकाचा हातच आपल्याला मिळतो. या पुष्पदरीची ओळख, तिचे भौगोलिक स्थान, या स्थानाचा इतिहास, फुलांचा प्रदेश म्हणून जगाला झालेली ओळख इथपासून ते इथे आढळणाऱ्या वनस्पती, फुलांच्या ओळखीपर्यंत असे सारे काही या पुस्तकात दडले आहे. हिमालयातील असंख्य रानफुलांच्या माहितीबरोबरच या पुष्पदरीच्या मार्गावरचे स्थलदर्शन, निसर्गदर्शन, या भागात आढळणारे वैशिष्टय़पूर्ण पशू-पक्षी, वनस्पती यांची माहितीही या पुस्तकात आहे. कुठल्याही भागाला त्याचे स्थानिक लोकजीवन, इतिहास, दंतकथाही असतात. घाणेकरांनी पुष्पदरीच्या या अंगांचाही वेध घेतल्याने जणू हा सारा परिसरच जिवंत झाला आहे. लेखकाच्या या उत्स्फूर्त लिखाणामुळे आपण जणू त्यांच्याच डोळ्यांनी आणि मनाने ही भटकंती करत आहोत असे वाटते. रंगांच्या या दुनियेवरील हे पुस्तकही बहुरंगी अशा प्रकाशचित्रांनी सजलेले आहे. एकूणच फुलांची ही दुनिया या पुस्तकातून तितकेच अनोखे रंग घेऊन आपल्यापुढे उभे राहते.
(व्हॅली ऑफ फ्लॉवर्स : स्नेहल प्रकाशन, पुणे.
लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर.
मूल्य : २२५ रुपये)

Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment